News & Announcement

कु. अनुराधा ढोले द्वितीय

मुरगूड: सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील विद्यार्थी हे दरवर्षी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर आपली कामगिरी गाजवत असतात. अशी कौशल्ये खेडोपाड्यातील मुला-मुलींमध्ये विकसित करणे हेच येथील प्राचार्य, प्राध्यापकाचे ध्येय आहे. चालू वर्षी दयाल सिंग कॉलेज, कर्नाल (हरियाणा) यांनी इंग्लिश लिटररी सोसायटी आणि टुगेदर वी कॅन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फूड अँड हेल्थ’ (आहार आणि आरोग्य) या विषयावर ऑनलाईन माध्यमातून नॅशनल लेवल स्लोगन कॉम्पीटीशन (राष्ट्रीय स्तरावरील घोषवाक्य स्पर्धा) आयोजित केली होती. संपूर्ण भारतातून अनेक महाविद्यालयीन युवक- युवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. मंडलिक महाविद्यालयातून सात विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी इंग्रजी विभागातील बी. ए. भाग – ३ या वर्गात शिकणारी कु. अनुराधा बाळासो ढोले हिने सदर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यासाठी कर्नाल कॉलेजकडून तिला प्रमाणपत्र व रोख रक्कम ऑनलाईन तिच्या खात्यावर जमा होणार आहे. कु अनुराधा मूळची सोनगे (ता. कागल) येथील महाविद्यालयांतर्गत घेतल्या जाणाच्या इंग्रजी हस्ताक्षर व वाचन स्पर्धामध्येसूवा वलिसे मिळविली आहेत- सुदूर स्पर्धेत विजेतेपद मिळवून तिने महाविद्यालयाचे व मुरगूडचे नांव उज्ज्वल केले आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए. डी. कुंभार यांच्या हस्ते कु. अनुराधा हिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी तिला इंग्रजी विभागाचे लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांचे मार्गदर्शन, प्राचार्य डॉ. ए.डी. कुंभार व उपप्राचार्य डॉ. डी. एम. पाटील यांची प्रेरणा लाभली. कु. अनुराधाच्या या उत्तुंग यशाबद्दल मुरगूड परिसरात सर्व स्तरावरुन तिचे खूप कौतुक व अभिनंदन होत आहे.

Copyright © 2024 - 2025, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top