JSES Song

Sanstha Geet- Din Dalita Javal Karaya

संस्था गीत 

दीन-दलितां जवळ कराया, दुर्बलांस सबळ कराया – २

दुरितांच्या अज्ञानाचा काळोख मिटविण्यासाठी

 काळोख मिटविण्यासाठी, आव्हान स्विकारत आहे

जय शिवराय प्रकाशत आहे -४

हा धर्म शाहूराजांचा, हा वारसा जोतिरावांचा -2

शुन्यातून विश्व उभवले, हा भीमपराक्रम ज्यांचा

जनतेवर सदाशिवाचा संस्कार आकारत आहे – 2

जय शिवराय प्रकाशत आहे -४

अज्ञान पोसूनी ज्यांनी, अडवला मार्ग ज्ञानाचा,

बांधून जातीच्या भिंती, दडवला सूर्य तेजाचा – 2

या असल्या युगा – युगांच्या अन्यायी इतिहासाला

अन्यायी इतिहासाला  आम्ही प्रश्न विचारत आहे

जय शिवराय प्रकाशत आहे -४

मानवता, विज्ञानाला, समतेच्या निर्माणाला – 2

स्वातंत्र्य – बंधुता मुल्ये भूमीत रुजवण्यासाठी

बांधील मराठी आम्ही काळजात भारत आहे -2

जय शिवराय प्रकाशत आहे -४

दीन-दलितां जवळ कराया, दुर्बलांस सबळ कराया – 2

दुरितांच्या अज्ञानाचा काळोख मिटविण्यासाठी

काळोख मिटविण्यासाठी आव्हान स्विकारत आहे

जय शिवराय प्रकाशत आहे -८

                          – श्री. गोविंद केरबा पाटील

 

JSES SONG – Sanstha Geet

Copyright © 2025 - 2026, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top