News & Announcement

वाणिज्य विभागाच्या वतीने ‘बँकिंग व्यवहार’ भित्तीपत्रकाचे उद्घाटन

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने नुकतेच भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. बँकिंग व्यवहार या विषयावर हे भित्तीपत्रक तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.डी.कुंभार यांच्या हस्ते या भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख डॉ एम.ए.कोळी , डॉ उदय शिंदे, प्रा.तृप्ती गवाणकर डॉ ए.जी.मगदूम आदी मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. भित्तीपत्रक तयार करणेसाठी कु कोमल चव्हाण, कु,कीर्ती एकल,वर्षा पाटील, रुपाली महाडेश्वर, गजानन भांदिगरे, विशाल आंगज, प्रवीण चौगले, ऋतुराज पाटील, अभिषेक कुंभार, ओमकार पाटील, सौरभ पाटील व राहुल बोन्गार्डे आदी विद्यार्थी विद्यार्थीनिनी परिश्रम घेतले.

Copyright © 2024 - 2025, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top