Socrates club

Socrates Club

सॉक्रेटिस क्लब हा महाविद्यालयातील एक वैचारिक आणि बौद्धिक व्यासपीठ आहे. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस यांच्या विचारसरणीपासून प्रेरणा घेऊन या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. “प्रश्न विचारा, विचार करा आणि सत्याचा शोध घ्या” हा सॉक्रेटिस यांचा मूलभूत संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या क्लबचा प्रमुख हेतू आहे.
या क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, साहित्यिक आणि समकालीन विषयांवर व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, वादविवाद आणि संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी, तर्कशुद्ध निर्णयक्षमता, प्रभावी संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. तसेच प्राध्यापकांनाही त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा प्राध्यापकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी एक प्रभावी मंच उपलब्ध होतो.
ज्ञानाची कक्षा रुंदावणे, विविध विषयांचे आकलन वाढविणे आणि समाजाभिमुख, विवेकनिष्ठ व जबाबदार नागरिक घडविणे हेच सॉक्रेटिस क्लबचे मुख्य ध्येय आहे.

 

Highlights 

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘भारतातील लोकसंख्या : वर्तमान स्थिती आणि भविष्य’ या विषयावर व्याख्यान संपन्न

महाविद्यालयातील साॅक्रेटिस क्लबच्या वतीने दि.१६/७/२०२६ रोजी घेण्यात आलेल्या व्याख्यान मालेत अर्थशास्त्र विभागातील प्रा.डाॅ. गुरुनाथ सामंत यांनी भारतातील लोकसंख्या वर्तमान स्थिती आणि भविष्य या विषयावर पुष्प गुंफले.

Copyright © 2026 - 2027, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top