THE FIRST YEAR STUDENTS OF B.A., B.COM., B.C.A. & B.Sc. can click the link below to seek admission for NSS 2020-21 BATCH
आपला प्रवेश छापील अर्जाद्वारे निश्चित करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा, अर्ज डाउनलोड करा, प्रिंट काढा व व्यवस्थित वाचून – भरून संबंधित प्रकल्पधिकार्याकडे फीसह जमा करा.
DOWNLOAD THE NSS APPLICATION FORM 2020-21
PLEASE READ THE INSTRUCTIONS THEREON BEFORE FILLING UP THE ADMISSION FORM
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे हळदी येथे श्रमसंस्कार शिबिर
गारगोटी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती आजही चिरंतन – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे
विश्व पर्यटन दिनानिमित्त मंडलिक महाविद्यालयात विशेष व्याख्यान
शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा युनेस्को वारसा यादीत समावेश — विद्यार्थ्यांना प्रेरणादायी इतिहासाची ओळख
मुरगूड : “आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी उभारलेले गडकोट आजही आपल्या शौर्य, संघटनकौशल्य व दूरदृष्टीची साक्ष देत उभे आहेत. या गडकोटांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे,” असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितेश रायकर यांनी केले.
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विश्व पर्यटन दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरवशाली इतिहास, गडकोटांचे महत्त्व, तसेच आजच्या पिढीसमोरील पर्यटन संवर्धनाची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रा. रायकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, “गडकोट हे फक्त दगड-मातीचे बांधकाम नाही तर ते स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. या किल्ल्यांमुळे शिवाजी महाराजांनी केवळ लढाया जिंकल्या नाहीत तर लोकांच्या मनात अभेद्य विश्वास निर्माण केला. आज पर्यटनाच्या माध्यमातून हे गड जागतिक स्तरावर पोहोचत आहेत आणि तरुणांना त्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळते.”
कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक प्रा. संजय हेरवाडे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “आजच्या युवकांनी पर्यटन केवळ आनंद किंवा विरंगुळा म्हणून न पाहता त्यामध्ये इतिहास, वारसा आणि संस्कृतीची जपणूक यांचा विचार करायला हवा. गडकोट आपल्याला स्वावलंबन, धैर्य आणि संघटन या गुणांचा धडा देतात. त्यामुळे अशा व्याख्यानांतून विद्यार्थ्यांना मिळणारी प्रेरणा त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरते.”
प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ पी आर फराकटे,प्रा. डॉ एम. एस. पाटील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा दीपक साळुंखे,प्रा स्वप्निल मेंडके, प्रा अवधूत पाटील, प्रा राहुल बोटे , प्रा संदीप मोहिते व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. सुशांत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रामचंद्र पाटील यांनी मानले.
अखंड भारताचे स्वप्न लोहपुरुषांच्या दृढ नेतृत्वामुळेच : प्रा. सुशांत पाटील
मुरगूड : “स्वातंत्र्यानंतर भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे संस्थानांचे विलीनीकरण होते. त्यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रगल्भ, दूरदृष्टीपूर्ण व दृढ नेतृत्वामुळे जवळपास ५६५ संस्थाने भारतात विलीन झाली. त्यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे अखंड भारताचे स्वप्न साकार झाले” असे प्रतिपादन प्रा. सुशांत पाटील यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय,मुरगूड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष व्याख्यान प्रसंगी बोलत होते.
प्रा.पाटील पुढे म्हणाले की “ऑपरेशन पोलो” सारख्या कठोर पण ऐतिहासिक निर्णयामुळे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले, तसेच देशाच्या ऐक्यासाठी पटेलांचे योगदान अढळ व प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी स्वागतपर प्रास्ताविक प्रा.दिगंबर गोरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे म्हणाले की, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्र निर्मितीत बहुमोल योगदान आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेत सहभागी व्हावे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.पी.आर.फराकटे, प्रा.डॉ.एच.एम.सोहनी, लेफ्ट.विनोद प्रधान, प्रा. स्वप्नील मेंडके, प्रा.धनाजी खतकर, प्रा.अवधूत पाटील, प्रा.अशोक पाटील, प्रा.संदीप मोहिते, प्रा.दयानंद कांबळे, प्रा सुहास गोरूले उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.दीपक साळुंखे, प्रा.नितेश रायकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा.रामचंद्र पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. संजय हेरवाडे यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे माध्यम : प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात शिक्षक सन्मान सोहळा
मुरगूड : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी होडगे यांच्या हस्ते करण्यात आले. “शिक्षण हेच खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दीपस्तंभ आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाचे स्मरण करून आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वेध घेऊन विद्यार्थी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ प्रा पांडुरंग सारंग यांनी शिक्षण हा समाज परिवर्तनाचा शाश्वत मार्ग असल्याचे त्याचबरोबर शिक्षण शाश्वत, ज्ञान संपत्ती कधीच संपत नाही माणसाने सतत शिकतच राहावे.शिक्षक हे दीपस्तंभा प्रमाणे आहेत असे ते म्हणाले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक साळुंखे यांनी राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या माध्यमातून होत असलेले विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचा आढावा प्रास्ताविकेतून मांडला.
यावेळी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांचा आर्ट्स फॅकल्टी प्रो डॉ माणिक पाटील, कॉमर्स फॅकल्टी लेफ्ट. विनोदकुमार प्रधान, सायन्स फॅकल्टी प्रा तेजस्विनी कांबळे, बीसीए फॅकल्टी प्रा विनायक माने यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य डॉ एस बी पोवार, लेफ्ट. विनोदकुमार प्रधान यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थी प्राचार्य कु.प्राची फराकटे, उपप्राचार्य कु.आरती गिरीबुवा, प्रशासकीय सेवक कु. अभिषेक पाटील व विद्यार्थी प्राध्यापक यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी कु.वैष्णवी कुंभार, कु.प्राची फराकटे ,कु.आरती गिरीबुवा यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रा रामचंद्र पाटील, प्रा सुशांत पाटील, प्रा स्वप्निल मेंडके, प्रा अवधूत पाटील,डॉ धनाजी खतकर, प्रा दादासाहेब सरदेसाई,डॉ एच एम सोहणी, प्रा सुहास गोरूले, प्रा राहुल बोटे, प्रा राजेंद्र पाटील,प्रा मनीषा सावेकर, प्रा अर्चना कांबळे, सतीश खराडे, सुमित जाधव, सुनील कडाकणे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा दिगंबर गोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा संजय हेरवाडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमास संस्थेचे सेक्रेटरी मा.खासदार संजय दादा मंडलिक, कार्याध्यक्ष मा. वीरेंद्र भैय्या मंडलिक यांची प्रेरणा तसेच महाविद्यालयातील सर्व घटक यांचे विशेष सहकार्य लाभले.
शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे मुरगूड































NSS SPECIAL CAMP AT SAVARDE BUDRUK, TAL.: KAGAL from 27th February to 04th March, 2020 See the Programme Below:














Totally 484 people responded to the Quiz as on 23 May, 2020
These are the highlights of our initiative at the background of pandemic COVID-19…



