दादोबा मंडलिक सभागृह, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन, महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या वतीने, जिमखाना विभाग प्रमुख, प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांनी केलेले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून योग गुरु, महाविद्यालयीन प्राध्यापिका कुमारी शिल्पा कुडवे ह्या होत्या. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी भूषविले होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख, प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांनी केले तर आभार प्रा. विनोद प्रधान यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व इतर उपस्थित होते. यावेळी शिल्पा कुडवे यांनी आजच्या जीवनात योगाचे महत्त्व सांगून योगातील काही आसने करून दाखविली व सर्वांच्याकडून करूनही घेतली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत, आपल्या महाविद्यालयात दिनांक १३,१४,१५ ऑगस्ट २०२३ रोजी जिमखाना विभागामार्फत ध्वजारोहण व इतर कार्यक्रम घेतले गेले. यामध्ये दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३५ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रा. डॉ. अद्वैत जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी उपप्राचार्य प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते ध्वजेचे पूजन होऊन प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. तसेच प्रा. डॉ. पी. आर. फराकटे यांच्या संयोजनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत व मनोगते व्यक्त केली. यावेळी सदर कार्यक्रमांचे स्वागत जिमखाना चेअरमन प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांनी केले, प्रास्ताविक प्रा. डॉ. पी. आर. फराकटे यांनी केले. आभार प्रा प्रशांत कुचेकर यांनी मानले. तर सूत्रसंचालनाची धुरा प्राध्यापिका ऐ. के. कांबळे यांनी सांभाळली. तर अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजक,
(प्रा. डॉ. शिवाजी पोवार) जिमखाना विभाग प्रमुख, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड.