मंडलिक महाविद्यालयात इंग्रजी हस्ताक्षर व इंग्रजी वाचन स्पर्धेला उदंड प्रतिसाद
मुरगूडः सालाबादप्रमाणे येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इंग्रजी हस्ताक्षर व वाचन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा बी.ए., बी.कॉम., बी.सी.ए. व बी.एस्सी. च्या सर्व वर्गांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या. या स्पर्धा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्या. दरवर्षी इंग्रजी विभागाचे लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान या स्पर्धा आयोजित करतात. महाविद्यालयाच्या सर्व विद्याशाखांमधून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यासाठी भरघोस प्रतिसाद दिला. इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये कु. अंकिता आनंदा वाडकर (बी.कॉम. भाग ३) – प्रथम, कु. प्रतिक्षा भिकाजी वरुटे (बी.सी.ए. भाग १) – द्वितीय व कु. सुप्रिया संजय तांबेकर (बी.ए. भाग १) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच, इंग्रजी वाचन स्पर्धेमध्ये कु. प्राजक्ता संजय डुरे (बी.ए. भाग ३), श्री. पृथ्वीराज दिपक पाटील (बी.एस्सी. भाग १) व कु. शबनम कमालपाशा मुल्ला (बी.ए. भाग १) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या सर्व विजेत्यांचे महाविद्यालयातर्फे व मुरगूड परिसरात अभिनंदन होत आहे. या विजेत्यांना महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आली. सदर स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.डी. कुंभार यांची प्रेरणा लाभली, तर प्रा. डी. ए. सरदेसाई, प्रा. अरुण कुंभार, प्रा. सूरज मांगले, प्रा. कु. तृप्ती गवाणकर, प्रा. कु. स्नेहा हवालदार यांचे सहकार्य लाभले.