शिवाजी विद्यापीठाचा ४३ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव ३ ऑक्टोबर ऐवजी १ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सवाचे यमजानपद सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड यांना मिळाले आ. विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाने युवा महोत्सवाचे वेळापत्रक व नियमावली जाहीर केली आहे. महोत्सवात लोकनृत्य, एकांकिका, लघुनाटिका, मूकनाट्य, पथनाट्य, लोकसंगीत, वाद्यवृंद, प्रश्नमंजुषा या सांघिक प्रकारासह सुगमगायन, स्थळ चित्र, व्यंग चित्र, वक्तृत्व (मराठी, हिंदी, इंग्रजी) या वैयक्तिक आदी ३२ कलाप्रकारांचा समावेश आहे. जिल्हास्तरीयमध्ये ३००, तर मध्यवर्ती युवा महोत्सवात २५० विद्यार्थी कलाकार सहभागी होतील.
जिल्हास्तरीय व मध्यवर्ती युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची मुदत आहे. सहभागी महाविद्यालयांनी सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेचे शुल्क पेमेंट गेटवे ऑनलाईन पद्धतीचे भरायचे आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना युवा महोत्सवात सहभागी होता यावे, यासाठी परीक्षांचे वेळापत्रक ३ ते १३ ऑक्टोबर हा कालावधी वगळून निश्चित करावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी केले आहे.