Sociology

 Department of Sociology

 

FACULTY OF THE DEPARTMENT

Asst. Prof. DR. DIPALI TUKARAM SAMANT

(M.A., D.Ed., B.Ed., SET, NET, DSM)

 

Asst. Prof. PATIL MANISHA HANAMANT

[ M.A., M. Lib.& I. Sc., SET (Sociology), SET, NET (Library Science)]

 

Department of Sociology is started  from the academic year 1996.  At present 178 students are studying in the department in various semester.  Department of sociology is known for various social initiatives in the college.  Prof. Pandurang S. Sarang is working as head of the department. He is well known  motivational speaker in this area. He has delivered more than 1500 lectures in surrounding area to make social awareness about various social issues.  Prof. V.A.Kamble is also working as assistant professor in this department.  

Programme features of the deparment- 

Anti Drug addiction programme   

Women Empowement Programmes 

Save the baby girl proramme

Tree plantation 

Cleanliness Campaign.

Environment and Pollution awareness programmes.

Value Education programme. 

Departmental Activity-

Workshops,

Seminars

Group Discussions

Paper reading

Surprize test

Wall papers

Internal Examinations Etc. 

Students Achievement- 

  1. Shri. Sagar Chitale B.A III/2018  National Level Running and Judo Champion.
  2. Shri. Rohan Rande B.A.III/2019 National Level Wrestling.
  3. Shri.Suraj Bhosale B.A.III/2020  National Level Kabbaddi. 

2025-2026 ACTIVITIES 

Study Tour of the Department

 

दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग आणि युवती विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास सहलीमध्ये प्रामुख्याने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील वि. स. खांडेकर म्युझियम, समाजशास्त्र अधिविभाग, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय मुलांना दाखवि ण्यात आले. त्यानंतर समाजामध्ये अशी काही विशेष मुले आहेत. त्यांना घडविण्याचे आणि आधार देण्याचे काम कोल्हापूर येथील चेतना विकास मंदिर ही संस्था करते. विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांशी संवाद साधून संस्थेची कार्यपद्धती समजावून घेतली. गतिमंद मुलांशी मनमोकळेपणाने गप्पा मारून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. या भेटीमुळे विशेष मुलांकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला.
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील बाहुबली मंदिर आणि बोट मंदिर दाखविण्यात आले.

 

 

 

 

 

 

Please Click the link to Register for the  Conference:

https://forms.gle/4mcSE8zuzNUbpV6T7

 

ORGANIZATION OF A STUDY TOUR


‘IGBTQUIA+ समुदाय: समज आणि गैरसमज’ वर एक दिवसीय कार्यशाळा

 

 

 

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मध्ये समाजशास्त्र विभागामार्फत “LGBTQIA+ समुदाय :समस्या, समज आणि गैरसमज “या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न :
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड, समाजशास्त्र विभागामार्फत LGBTQIA+ समुदाय :समस्या, समज आणि गैरसमज एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटक कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.आर.शिंदे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ.प्रतिभा देसाई समाजशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर., प्रा. अरविंद घोडके समाजशास्त्र विभाग, न्यू कॉलेज कोल्हापूर, तृतीयपंथी समुदायातील मा. शिवानीताई गजबर, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस. एम. होडगे, उपप्राचार्य डॉ.एस.बी. पोवार, अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.डी.ए. सरदेसाई, प्रा. लेफ्टनंट विनोदकुमार प्रधान, कार्यक्रम समन्वयिका प्रा. डॉ. दिपाली सामंत, सहसमन्वयिका प्रा. मनीषा पाटील तसेच सर्व आता प्राध्यापकवृंद, इतर महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते रोपट्यास पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. दिपाली सामंत यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. बीजभाषणामध्ये प्राचार्य डॉ. यू. आर.शिंदे यांनी तृतीयपंथी समुदायाची एकूण जगातील आकडेवारी सांगून, तृतीयपंथी व्यक्तींना समाजात भेदभाव, हिंसाचार व उपेक्षा अशा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.एस.एम. होडगे यांनी केले. उद्घाटन समारंभाचे आभार अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डी. ए. सरदेसाई यांनी केले. एक दिवसीय कार्यशाळेत तीन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रासाठी साधन व्यक्ती म्हणून लाभलेल्या प्रा. डॉ. प्रतिभा देसाई यांनी LGBTQIA+ समुदाय या विविध इंग्रजी शब्दांची ओळख करून दिली. त्याच बरोबर द ट्रान्सजेन्डर पर्सन्स 2019 ॲक्ट समजावून सांगितला. तसेच तृतीयपंथी यांना कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रथम सत्रासाठी अध्यक्ष मनोगत डॉ. डी. के. पाटील यांनी केले. प्रथम सत्राचे आभार प्रा.डॉ.अशोक पाटील यांनी मानले.
दुसऱ्या सत्रामध्ये तृतीयपंथी समुदायातील अभ्यासू व्यक्तिमत्व मा. शिवानीताई गजबर यांनी त्यांना स्वतःला आलेले अनुभव सांगून विद्यार्थ्यांच्या समोर तृतीयपंथी व्यक्तींच्या व्यथा आणि वास्तव्य तसेच शिवानीताईना कुटुंबाशी,समाजाशी व स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवानी ताई आपल्या मनोगतात म्हणतात की “आम्ही सर्व माणसांना आपुलकीच्या, सहानुभूतीच्या नजरेने पाहतो तो आमचा समज आहे. पण तुम्ही आम्हाला वेगळ्या नजरेने पाहता हा तुमचा गैरसमज आहे. ”
अध्यक्ष मनोगत प्रा. डॉ. धनाजी पाटील यांनी केले. तसेच आभार प्रा.एम. एच. पाटील यांनी मानले. यानंतर तृतीय सत्राची सुरुवात करण्यात आली. या सत्रासाठी साधन व्यक्ती म्हणून लाभलेले प्रा. अरविंद घोडके यांनी LGBTQIA+ समुदाय याविषयी संशोधन करून त्यांना संशोधनातून आलेले अनुभव, अत्यंत भावपूर्ण प्रसंग विद्यार्थ्यांच्या समोर व्यक्त केले. तृतीयपंथी हे देखील आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे आपली त्यांच्याविषयी असणारी भूमिका कोणत्या प्रकारची असायला हवी हे स्पष्ट केले. एकूणच ही कार्यशाळा तृतीयपंथी समुदायाविषयी असलेल्या शंका, प्रश्न आणि गैरसमज दूर करून विद्यार्थ्यांना एक समज देणारी,संवेदनशीलता आणि बांधिलकीची जाणीव करून देणारी ठरली. सूत्रसंचालन प्रा.अर्चना कांबळे प्रा. डॉ.सोनाली कुंभार यांनी केले. तर आभार नितेश रायकर यांनी मानले.

 

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात रोजगारोन्मुख हिंदी विषयावर मार्गदर्शन

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येथे, दिनांक 25 -08- 25 रोजी हिंदी विभागाच्या वतीने रोजगारोन्मुख हिंदी या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी होडगे सर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये हिंदी विभागाचे प्रा. बी के सारंग सर यांनी रोजगारोन्मुख हिंदी या विषयावर विचार मांडत असताना हिंदी भाषेतील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले . यामध्ये हिंदी अनुवाद सोशल मीडिया ,पत्रकारिता, पटकथा लेखन ,ब्लॉग लेखन ,हिंदी सॉफ्टवेअर ,प्रतियोगी परीक्षा मध्ये हिंदी भाषेचे महत्त्व तसेच कंटेंट लेखन ,सरकारी बँक ,न्यायिक सेवा सिविल सर्विस ,रेल्वे इत्यादी क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अनेक संध्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य शिवाजीराव होडगे सरांनी हिंदी विभागामार्फत आयोजित केलेला हा कार्यक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार काढले .या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. एच एम सोहनी सर यांनी केले .सरांनी प्रास्ताविक मांडत असताना हिंदी भाषेचे महत्व तसेच हिंदी भाषेमध्ये पदवी ,उच्च पदवी प्राप्त केल्यानंतर रोजी रोटी मिळवण्याच्या विविध क्षेत्रांची माहिती सांगितली .कार्यक्रमाचे आभार विद्यार्थिनी श्वेता पाटील हिने केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अशोक पाटील यांनी केले.कार्यक्रमासाठी बी ए भाग -एक ,दोन ,तीन चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

CELBRATION OF RAKSHABANDHAN AT MURGUD POLICE STATION  ON FRIDAY 08 AUGUST 2025

 

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामार्फत मुरगूड पोलीस बांधवांसमवेत ‘रक्षाबंधन’ उपक्रम साजरा

 

 

 

 

Copyright © 2026 - 2027, All rights reserved | Website Design & Developed by Pixel Chopper

Back To Top