RAKSHABANDHAN मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील दिनांक 29 ऑगस्ट रोजी विवेक वाहिनी तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला . महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राखी गोळा करून भारतीय सैन्यदलातील सैनिकाना बांधून काही राख्या त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या, त्या सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत. महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. फराकटे यानी प्रास्ताविक व स्वागत केले. सुभेदार प्रशांत जेमिनीक, सुभेदार भाऊसाहेब चौरे, हवालदार शंकर सायनेकर , हवालदार कुबेर सिंग याना महाविद्यालयातील विद्यार्थिनी व इतिहास विभागाच्या प्रा. सौ. अर्चना कांबळे यांनी या सर्वांना राखी बांधून त्यांच्याकडे उरलेल्या राख्या सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ. टी. एम. पाटील, शारिरीक शिक्षण संचालक प्रा. डॉ. शिवाजीराव पोवार, प्रा. अर्चना कांबळे, प्रा. प्रशांत कुचेकर, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी , एन.सी.सी कॅडेट सुद्धा उपस्थित होते.
Celebration of Death Anniversary Dr. Narendra Dabholkar on 23 August 2023
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यतिथी विवेक वाहिनी तर्फे आयोजित करण्यात आली. यावेळी डॉक्टर दाभोळकरांच्या प्रतिमेला डॉक्टर राजेंद्र कुमार यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, अंधश्रद्धा निर्मूलनाचे अध्यक्ष, माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार हे होते. यावेळी ते म्हणाले की, देव व धर्माचा वापर सामान्य लोकांना फसविण्यासाठी तसेच पैसा मिळविण्यासाठी केला जातो. समाजाने व्यवस्थेलासुध्दा प्रश्न विचारले पाहिजेत .उत्तरे सुद्धा शोधली पाहिजेत. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार सर म्हणाले की, अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन मोठेमोठया विचारवंताचे एक व्याख्यान आयुष्य बदलून टाकते. यावेळी इतिहास विभागाकडून प्रा. डॉ. फराकटे यानी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी विचार मंचावर प्रा. डॉ. होडगे, प्रा. डॉ. शिवाजी पोवार तसेच उपस्थितीमध्ये प्रा. डॉ. उदयकुमार शिंदे, प्रा. डॉ. एस. के पवार, प्रा. सरदेसाई, प्रा. सारंग, प्रा. विनोद प्रधान, प्रा. सौ. कुंभार तसेच बी.ए., बी. कॉम., बी.एससी., बी.सी.ए या विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. ए.के कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पी. पी. कुचेकर यांनी व्यक्त केले.